'योद्धा शेतकरी' आणि बरंच काही...

“प्रेमाची जोशींची व्याख्या वेगळीच होती. प्रेमावर बोलताना ते मला म्हणाले, आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात असतो नं, तेव्हा ती व्यक्ती जणू काही सूर्य होते आपल्यासाठी. सूर्याभोवती जसे ग्रह फिरतात, तसं आपलं अवघं विश्व तिच्याभोवती फिरत असतं. ती व्यक्ती म्हणजे जणूकाही जीवनाचं केंद्रच, असं वाटत. ती व्यक्ती नाही तर जीवन नाही, इतपत मनोवस्था येते. ओशोंनी हे फार सुंदर वर्णन केलं आहे. सुफी तत्त्वज्ञानात प्रेमासाठी दोन शब्द आहेत. एक म्हणजे मोहब्बत आणि दुसरं म्हणजे इश्क. मोहब्बत म्हणजे सामान्य दर्जाचं प्रेम. जे काही क्षणी असतं तर कधी नसतंदेखील. त्यामध्ये गेहराई नसते. ज्यामध्ये तुम्ही काही अंशी तरी स्वत:च्या नियंत्रणात असता. पण इश्क ही भिन्न गोष्ट आहे. इश्कात संपूर्ण विलय आहे. हरवणं आहे. स्वत:ला गमावून बसणं आहे. इश्कामध्ये मृत्यूपूर्वी मृत्यू अनुभवणं आहे.” हे वाचून कोण्या प्रेमावर वगैरे लिहिणाऱ्या लेखकाने हे सांगितलं असावं, असा तुमचा समज होईल. पण शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांचे हे विचार. वाचून थोडा धक्का बसला ना ? 'शरद जोशी- शोध अस्वस्थ कल्लोळाचा' हे वसुंधरा काशीकर- भागवत...