सुरूवात परिवर्तनाची
२६ मे २०१४ रोजी श्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्रीपदाची शपथ घेतली आणि देशाच्या इतिहासात एका नव्या पर्वाचा प्रारंभ झाला. हे पर्व आहे विकास आणि सुशासनाचे. १६ मे २०१४ ला जो निकाल आला, तो फक्त एका पक्षाचा विजय आणि दुसऱ्या पक्षाचा पराभव एवढाच नसून देशाच्या राजकारणात झालेल्या एका मोठ्या बदलाचं ते प्रतिक आहे. नरेंद्र मोदी यांचे सर्वांत मोठे श्रेय म्हणजे त्यांनी भारतीय राजकारणाला प्रचलित धर्म आणि जात यांच्या विळख्यातून सोडवून विकासाच्या मार्गावर आणले. हे एक महत्वपूर्ण परिवर्तन आहे. कालपासून (२६ मे २०१५) मोदी सरकारचे दुसरे वर्ष सुरू झाले आहे. अनेक बाबतींत मोदी सरकारचे एक वर्ष हे वैशिष्ट्यपुर्ण राहिले आहे. त्यावर एक नजर टाकूया : · अर्थव्यवस्था : मागच्या एक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनली आहे. जीडीपी विकास दर ४% झाला आहे. एफडीआय इक्विटी इनफ्लो ३९% ने वाढून $२८८१३ मिलियन इतका झाला आहे. १ एप्रिल २०१६ पासून जीएसटी लागू झाल्यावर कर प्रणाली आणखी सोपी होईल. · ...