राजयोगी नेता

आज अटलजींना भारतरत्न प्रदान करण्यात आले, यानिमित्ताने तरी त्यांचे दर्शन घडेल अशी अपेक्षा होती, मात्र फक्त छायाचित्रावर समाधान मानावे लागले. त्यामुळे जरा हिरमोड झाला असला तरी एका अटलजींना भारतरत्न मिळाला आहे, हा आनंद अगदी अवर्णनीय असाच आहे. तस पाहायला गेल तर अटलजी म्हणजे आमच्यासाठी जुन्या पिढीतले राजकारणी. पण या जुन्या पिढीतल्या नेत्याने आमच्यावर एक वेगळच गारुड केलय. अटलजींकडे पाहिल्यावर आपोआप आदर वाटतोच पण सोबतच एक आपलेपणाही जाणवतो. अटलजी म्हटले की सर्वांत अगोदर आठवतात ती त्यांची भाषणे ! भारतरत्न प्रदान करताना महामहीम राष्ट्रपती ! हिंदीवर असामान्य प्रभुत्व, तोंडपाठ असणारे संदर्भ आणि जरा श्रोत्यांचा अंदाज घेत केलेली अचूक शब्दफेक. एक वेगळीच नजाकत त्यांच्या भाषणात असायची. त्यांची संसदेतील भाषणे ऐकणे म्हणजे तर पर्वणीच. ज्यांनी अटलजींना प्रत्यक्ष बोलतांना ऐकलय, पाहिलय त्या सर्वांचा खूप हेवा वाटतो. प्रचारसभा अथवा अन्य सभा यांत काय बोलावे आणि संसदेत काय बोलावे याचा वस्तुपाठच अटलजींनी घालून दिला आहे. आमच्या आजच्या “नेत्यांनी” हे जरुर शिकण्यासा...