कधी कधी आपल्याला काहीच करावस वाटत नाही, अगदी आपण काहीच करत नसतांनासुद्धा!
"काहीच करावस वाटत नाही" याची एक गंमतच असते. त्याला स्थळ काळ आणि वेळ अस कोणतच बंधन नसत.
काहीच करावस न वाटल्यामुळे आपण फक्त बसलेलो असतो आणि (तरीही) एकदम एखाद पुस्तक हातात घेतो. ते वाचतांना एखादा उतारा आपल्याला आवडून जातो आणि त्याच्या संदर्भाने आठवणाऱ्या घटनांचा एक चित्रपट डोळ्यासमोर (की मनासमोर!) तरळून जातो, पण तो संपला की पुन्हा एकदा काहीच करावस वाटत नाही. मग आपण उगाचच खिडकीपाशी उभे राहतो आणि समोर दिसणारी व्यक्ती वाचायला लागतो आणि त्यात एवढे गुंतून पडतो की आपल्याला काहीच करायच नव्हत याचाच विसर पडतो.
तस पहायला गेलो तर "काहीच करावस" वाटत असतांनाही आपण खूप काही करत असतो. अनेकदा अस वाटण खूप आवश्यक असत, कारण त्या निमित्ताने अनेक अव्यक्त भावना आपण कळत- नकळत व्यक्त करत असतो. कधी कधी भावनांचा गुंता सोडवायला अस वाटण्याची खूप मदत होत असते.
©
*पार्थ कपोले

*२०/९/२०१४
''काहीच न करावसं वाटण्याच्या मनाच्या या अवस्थेच एकदम सहज..सुंदर..स्पष्टीकरण..!''
उत्तर द्याहटवा