बीती हुई एक छोटी घड़ी

रिश्ते बनते हैं बडे धीरे से बनने देते सूखे लम्हे को जरा शाख पे पकने देते एक चिंगारी का लगना था कि पर काट दिए आंच आई थी जरा आग तो जलने देते एक ही लम्हे पे एक साथ गिरे थे दोनों खुद संभलते या जरा मुझको संभलने देते कोणतीही नातं असचं तर असतं. म्हणजे ते तयार व्हायला काही वेळ द्यायला लागतोच. म्हणजे परस्परांना समजून घेण्यात आणि परस्परांची नेमकी ओळख होण्यात वेळ हा लागतोच. आणि तेवढा वेळ जर दिला नाही किंवा द्यायची तयारी नसेल तर मग मात्र समीकरण काही जुळत नाही. आणि मग पुन्हा ते समीकरण जुळवण्याचा प्रयत्न करायला लागतो. या स्थितीचं अगदी योग्य वर्णन केलंय. संपुर्णसिंह कालरा उपाख्य गुलजार. आपल्या शब्दांनी जगाला वेड लावणारा अवलिया. नुकतचं (शुक्रवारी) त्यांनी 84व्या वर्षात पदार्पण केल. चेहऱ्यावर मिश्किल हास्य, शुभ्र रंगाचा कुडता, पायजमा आणि डोळ्यांवर साधासा चष्मा अशा रूपात असणारे गुलजार हे 83 वर्षांचे झाले, यावर विश्वास बसत नसला तरी ते सत्य आहे. गुलजार हे एक वेगळचं रसायन आहे. त्यांचं लिखाण अगदी साधं आणि सोपं आहे, फारसा शब्दफुलोरा त्यात कधीच नसतो. पण ते जे कागही लिहीता...