वेश्या
"वेश्या" हा शब्द ऐकताच अंगावर पाल पडल्यासारखे "शी" असे किंचाळणारे आपण "प्रतिष्ठित" नागरिक आपल्यात आणि वेश्येत फारसा फरक नाही हे विसरणारे आपण प्रतिष्ठित आम्ही राहतो तो समाज आणि त्या राहतात ती वेश्यावस्ती अशी समजूत घालणारे आपण प्रतिष्ठित आपण करतो ते काम आणि त्या करतात तो धंदा अशी निर्बुद्ध विभागणी करणारे आपण प्रतिष्ठित चेहरा रंगवून रोज गिऱ्हाईक घेतात म्हणून त्या वाईट आणि आपण रोज शुचिर्भूत होऊन तेच करणारे प्रतिष्ठित पण आपण एक गोष्ट विसरत असतो ही गिऱ्हाईक आपल्यातलीच प्रतिष्ठित असतात आज आपल्या समाजच रुपांतरही वेश्यावस्तीत होऊ लागलय रोज शुचिर्भूत होऊन सोवळ्याचा आव आणायचा आणि नंतर तथाकथित मूल्यांचा खुलेआम बलात्कार करायचा आज आपण प्रतिष्ठीतांनी समाजाला वेश्यावस्ती बनवलय खुलेआम तथाकथित मुल्यांचा धंदा मांडून आणि आपणच गिऱ्हाईक बनलोय - पार्थ विकास कपोले ...