मोदींनंतर ‘शहा’च...?

“ऐ कून घेण्याची सवय आता लावून घ्या ओवेसी साहेब. ऐकून घ्यावेच लागेल. कोणाला घाबरविण्याचा प्रश्नच नाही, पण एखाद्याच्या मनातच भय असेल, तर त्यावर आम्ही काहीही करू शकत नाही...”. लोकसभेत एनआयए सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू असताना गृहमंत्री अमित शहा यांनी एआयएमआयएचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांना अशा भाषेत सुनावले. त्यानंतर सभागृहात भाजपच्या खासदारांनी बाके तर वाजवलीच, मात्र समाजमाध्यमांवरही भाजप समर्थक दोन दिवस याच गोष्टीची चर्चा करीत होते. अमित शहा यांचा हा आक्रमकपणा भाजप आणि समर्थकांच्या वर्तुळात नेहमीच कौतुकाचा विषय राहिलेला आहे. यापू्र्वी केवळ पक्षाध्य़क्ष असताना ज्या ज्या वेळी शहा भाजप मुख्यालयात असतील, त्या त्या वेळी मुख्यालयात कमालीची शांतता पहावयास मिळायची. मुख्यालयात उगाच येणाऱ्या ‘भाईसाहब’ मंडळींनी तर कामाशिवाय येणेच बंद केले आहे. एकुणच शहा यांचा आदरयुक्त दरारा असल्याचे चित्र आहे. त्यात शहा यांच्या मनात नेमके काय चालले आहे, याचा अंदाज लावणे अगदीच कठीण, कारण कोणाशीही बोलताना त्यांचा चेहरा अगदी कोरा असतो, कामापुरती प्रतिक्रिया देणे ते पसंत करतात. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या...