‘स्व’- रूपवर्धिनी – ‘माणूस’ घडवणाऱ्या प्रयोगशाळेची गोष्ट

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हजारो कार्यकर्ते आज देशभरात वेगवेगळ्या माध्यमातून समाज घडविण्याचे काम करत आहेत. काही प्रचारक म्हणून, काही संघ परिवारातील संस्थांमधून तर काही स्वतंत्र संस्था स्थापन करून. अशीच एक संस्था म्हणजे ‘स्व’-रुपवर्धिनी. हि फक्त संस्था नाही, तर हि आहे माणूस घडवणारी प्रयोगशाळा. आजपर्यंत या संस्थेबद्दल खुप ऐकल होतं, त्यामुळे मंगळवार पेठेत असलेल्या या संस्थेस प्रत्यक्ष भेट दिली. संस्थेच्या शिरीष पटवर्धन यांच्याशी अगदी मनमोकळ्या गप्पा मारल्या. या गप्पांमधूनच या प्रयोगशाळेची गोष्ट उलगडत गेली. १९७९ साली आंतरराष्ट्रीय बालक वर्षाचे निमित्त साधून या आगळ्यावेगळ्या प्रयोगशाळेची स्थापना केली ती किशाभाऊ पटवर्धन यांनी. पेशाने शिक्षक असलेले किशाभाऊ संघ प्रचारकही होते. त्यामुळे समाजात मिसळून काम करणं त्यांना नवीन नव्हतं. ही संस्था स्थापन करण्यामागे किशाभाऊंनी एक विशिष्ट असा विचार समोर ठेवला होता, कारण संस्था स्थापन करून, देश विदेशातून देणग्या जमवून ‘दुकान’ चालवण त्यांना जमणारच नव्हतं. किशाभाऊ हे मंगळवार पेठेतील एका शाळेत मुख्याध्यापक होते. शाळेतल्या विद्यार्थ्यांशी त्याचं ...