"गावा"वर अवलंबून असलेल शहर
कपडे घ्यायचे - चला गावात, भाजी घ्यायची - चला गावात, पुस्तक घ्यायचे- चला गावात,असे शब्द कानावर पडले कि समजायचे कि आपण धुळ्यात आहोत. प्रत्येक गोष्टीसाठी धुळेकर गावावर अवलंबून आहेत. धुळे शहराचे नैसर्गिकरीत्या पांझरा नदीमुळे गाव आणि देवपूर असे २ भाग झाले आहेत. शहराची मुख्य बाजारपेठ म्हणजे आग्रा रोड (पूर्वीचा मुंबई - आग्रा महामार्ग), पाच कंदील मार्केट. धुळे करांचे खरेदी विषयक भावविश्व हे या दोन भागांशी घट्ट जोडलेलं आहे. अगदी लहानात लहान खरेदी सुद्धा गावात जाऊन केल्याशिवाय धुळे करांचे समाधान होत नाहि. आता आपण धुळ्यातील हि खरेदी विषयक महत्वाची ठिकाणे पाहुया. कपड्यांसाठी आकाशदीप, जुगल वस्त्रालय, विजय, रेमंड, पारंपारिक आणि अभिजात वस्त्रांसाठी न्यू क्लोथ , खंडू गणपत शेठ वाणी (खास खण कापड! ), त्यानंतर सौदर्य प्रसाधने, सजावटीच्या वस्तू यासाठी यासाठी खोल गल्लीतील(अथवा बांबू गल्ली) राजू भावसार फेटेवाले, अलंकार. त्यानंतर पुस्तकांच्या आणि फुलांच्या खरेदीसाठी फुलवाला चौक. भेटवस्तू , क्रोकरी यासाठी फक्त आणि फक्त ओल्ड आणि न्यू कादरी. भाजी, फळे, मसाले यासाठी तर पाच कंद...