लम्हा लम्हा
जरा फासले पर पहुंचे तो यह एससास हुआ कोई कितने करीब से गुजर कर चला गया था काही लोक अगदी साध्या शब्दात लिहीतात. म्हणजे ते शब्द तुम्ही – आम्ही वापरतो, तेच असतात. पण त्यांचे शब्द आपल्या मनाला भावतात. असं का होत असेल ?. अर्थात, प्रश्नाचं उत्तर मिळणं अवघड आहे. किंवा काही प्रश्नांची उत्तरं मिळायलाच हवी, याचा हटट्ही धरायला नको. काही शब्द असेच अनुत्तरीत राहू द्यायला हवे. जेणेकरून पुन्हा त्यांच्या वाटेला गेलो की काही जुन्या आठवणी उफाळून वर यायला हव्यात. त्या आठवणी नेहमीच जीवंत रहायला हव्यात. म्हणजे काही शब्दांचे अर्थ अगदी व्यवस्थित लागतात. आता दीप्ती नवल यांच्या या दोन ओळी अनुभवायच्या असतील तर सर्व काही जागच्याजागी असून कसं चालेल ? चलो दूर तक अजनबी रास्तो पे पैदल चलें कुछ न कहें अपनी अपनी तन्हाइयां लिये सवालों के दायरों से निकल कर रिवाजों की सरहदों के परे हम यूं ही साथ चलते रहें कुछ न कहें तुम अपनी माजी का कोई जिक्र न छेडो मैं भुली हुई कोई नज्म न दोहराऊं तुम कौन हो मै क्या हूं इन सब बातों को, बस रहने दें कुछ न कहें चलो दूर तक अजनबी रास्तों पे पैदल चलें स्वत:ला विसरून असं जगण्यात एक वेगळीच मजा अस...