‘स्वीट’कॉर्न क्लब – मधुमक्याची गोष्ट

फर्गसन महाविद्यालय रस्त्यावरील आउटलेट पुण्यातल्या फर्गसन महाविद्यालय रस्त्यावर पोलीस ग्राउंडच्या समोर ‘कॉर्न क्लब’ असा बोर्ड असलेल एक छोटेखानी रेस्टोरंट आपल लक्ष वेधून घेत. तिथे पाउल ठेवल्यावर मधुमका अर्थात स्वीट कॉर्न च्या अनोख्या जगात आपला प्रवेश होतो. एरवी फक्त भाजून खाणे एवढाच आपला मक्याशी संबंध येत असतो, आणि इथे मात्र मधुमक्याची एक वेगळीच दुनिया आपल्या समोर येते आणि आपल्याला त्यात अगदी हरवून जायला होतं. त्याबद्दल कॉर्न क्लबचे राहुल म्हस्के यांच्याशी बोलल्यावर ते म्हणाले, ‘या उद्योगाची सुरुवात एका साध्या गोष्टीतून झाली. १९९९ साली माझी पत्नीने मॉडेल कॉलनीत स्वीट कॉर्नच्या विविध तयार पदार्थांचे दुकान सुरु केले. कारण मधुमका हा खायला अतिशय गोड आणि मऊ आहे. त्याची वैशिष्ट्यपूर्ण गोड चव सर्वांनाच आवडते. त्याचे वैविध्यपूर्ण पदार्थ विक्रीस ठेवले, त्याला ग्राहकांचा अगदी उत्तम प्रतिसाद मिळाला. त्याच काळात स्वीट कॉर्नची ओळख नुकतीच लोकांना व्हायला लागली होती. त्यामुळे लोकांची पसंती आम्हाला मिळाली. आज या अतिशय छोट्या प्रयोगाचे रूपांतर Monsoon Agro Bio LTD अशा मोठ्या उद्योगात झाले आहे. ...